शिवसंपर्क अभियानास तुळजापूर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद...

 
x

तुळजापूर- शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशाने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा, सिंदफळ, काटगाव येथे जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांनी शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे-पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, शहरप्रमुख सुधीर कदम, शाम मामा पवार, शिवअल्पसंख्याक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख, धाराशिव माजी शहरप्रमुख प्रवीण भैय्या कोकाटे, भीमा आण्णा जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख मुळे ताई, शिंदे ताई,  युवासेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, युवासेना शहराध्यक्ष सागर इंगळे, उपशहरप्रमुख बापू नाईकवाडी,सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, अर्जुन आप्पा साळुंखे, बाळासाहेब शिंदे, विभागप्रमुख बालाजी पांचाळ, उपसरपंच विनोद ठोंबरे, हणमंत जाधव, विशाल गायकवाड, दादा माळी, मनोज गायकवाड, सचिन एकंडे, शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य मनोज गायकवाड, दिनेश भोजने, गणेश धनके, बाळासाहेब डोंगरे, याकूब इनामदार, महेश नवगिरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

x

यावेळी बोलताना आ.कैलास पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील, शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविणे हा शिवसंपर्क अभियानाचा मुख्य उद्देश असून तो साध्य होत आहे. शिवसेना हे सामान्य माणसाचे छत्र आहे. शिवसैनिकांच्या बळावरच शिवसेना उभी आहे. एखादी निवडणूक असली की, घरावर तुळशी पात्र ठेवून शिवसैनिक निष्ठेने काम करतो. ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांची श्रद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून शिवसैनिक काम करत आहेत. जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये समनव्यय साधण्याचा या शिवसंपर्क अभियानातून आपला प्रयत्न असून शिवसैनिकांनी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी गावं तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक करावा असे आवाहन आ.कैलास पाटील यांनी केले.

From around the web