डिग्गी गावात अवैध धंदे खुलेआम
उमरगा - उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत.हातभट्टी आणि गावठी दारू राजरोस विक्री असताना पोलीस डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत. अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये ठराव घेवुन देखील हे धंदे राजेरोसपणे चालू आहेत
याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने लक्ष वेधले असता उमरगा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाही करायची सोडून त्यांनी ग्रामपंचायत मध्ये शुक्रवारी रात्री मिटींग घेवून तरुणांनाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला. बीट अंमलदार यांना अवैध धंदे कोण कोण करत हे सर्व माहीत असून देखील फ़क्त बघ्यांची भूमिका घेतली.
डिग्गी ग्रामपंचायतने निवेदन देवून देखील पोलीस कारवाई करीत नाहीत.गावातील तरुणांनीं कायदा हातात घ्यावा का ? आणि या तरुणांना उद्या कांही झालं तर याची जबाबदारी घेणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या मीटिंगचा व्हिडीओ गावातील तरुण करत असताना पोलीस निरीक्षकांनी व्हिडीओ करणाऱ्यांना दमबाजी केली. सर्वसामान्य नागरिकांनीं न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.