खताचा जुना साठा  जुन्या दराने न विकल्यास दुकानाचा परवाना रद्द 

कृषी अधिकाऱ्यांनी उपलब्ध खत साठा दोन दिवसात तपासणी  करून अहवाल द्यावा- पालकमंत्री 
 
खताचा जुना साठा जुन्या दराने न विकल्यास दुकानाचा परवाना रद्द

उस्मानाबाद -  जिल्ह्यात जुन्या दराचे उपलब्ध असलेले खत शेतकऱ्यांना जुन्या दरानेच मिळाले पाहिजे. उपलब्ध खताचा साठा दोन दिवसात तपासणीचे कृषी विभागाला निर्देश. दुकानदारांनी खताचा  साठा आणि त्याचे दर दर्शनी भागात लावणे.संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी उपलब्ध खत साठा दोन दिवसात तपासणी  करून घ्यावी. शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घ्याल तर विक्री परवाना रद्द होईल. असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिला आहे.


खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. परंतु, जिल्ह्यात पूर्वीच्या दराचे खत उपलब्ध  झालेले आहे. तरीही शेतकऱ्यांना नवीन वाढीव दराने खत शेतकऱ्यांना दिले जाऊ शकते. दरम्यान सध्या जिल्ह्यात जुन्या दराच्या खताचा किती साठा आहे. याबाबत माहिती घेण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या आहेत. कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेवर होणे  तसेच  खतांची विक्री जादा दराने होणार नाही  याची खबरदारी  भरारी पथकामार्फत  कृषी विभागाने घेण्याचे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.त्यानुसार जुन्या दराने जिल्ह्यात आलेले खत शेतकऱ्यांना जुन्याच दराने मिळाले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाने खबरदारी घ्यावी. काही दुकानदार आणि खत विक्रेते जास्तीच्या दराने खताची विक्री करण्याचे संकेत मिळत आहेत. 

शेतकऱ्यांनी याबाबत खुलेपणाने लेखी तक्रार द्यावी. प्रत्येक तालुका स्तरावर खताच्या बाबत काही अडचण असेल तर कृषी विभागाकडे तक्रार देता येणार आहे. शिवाय काही दुकानदार खत उपलब्ध असूनही खत नसल्याचे सांगत आहेत. तसेच दुकानदारांनी जुन्या दराच्या खतांची साठेबाजी करू नये. जर असे प्रकार घडले तर संबंधीत खत दुकानदारावर कडक कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांनी खताची खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. एमआरपी किती आहे, याची खात्री करावी. त्यानुसारच खताची खरेदी करावी.   याशिवाय शेतकऱ्यांनी इ-पॉस मशीनची पावती व पक्की पावती दुकानदाराकडून घ्यावी.  त्यासाठी शेतकऱ्यांनी खताची खरेदी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. ठराविक एक कंपनी व विशिष्ट ग्रेडच्या खताचा आग्रह शेतकरी बांधवांनी करू नये. प्रत्येक दुकानात दुकानदाराने उपलब्ध खताचा साठा आणि त्यांची किंमत दर्शनी भागात लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.जर काही दुकानात असे प्रकार दिसून आले नाही, तर त्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे करावी. त्यानुसार खत दुकानदारावर कारवाई केली जाईल.

पुरेसे खत मिळणार

जिल्ह्यात सध्या जुन्या दराचे खत उपलब्ध आहे. दरम्यान काही दुकानदार खताची टंचाई होईल, असे सांगत आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून कमी किंमतीचे खत जास्तीने विक्री करण्याचे प्रकार घडू शकतात. सध्या जिल्ह्यात खताचा साठा पुरेसा आहे. याशिवाय अजूनही खत येणार आहे.खत पुरवठा सध्या सुरू आहे. त्यामुळे खरिप हंगामात खताची टंचाई भासणार नाही. पुरेसे खत येईल, अशी व्यवस्था करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता, खताची खरेदी करावी. खताची भाववाढ झाली असली तरी साठा मात्र पुरेसा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे.

From around the web