उस्मानाबाद लाइव्हचा दणका
उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांची अखेर पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी भूमच्या उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.
एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा व्हावा तश्याच पद्धतीने तेर पोलीस चौकीचा पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर याचा वाढदिवस 15 जुलै ( गुरुवार ) रोजी साजरा करण्यात आला, तेही चक्क पोलीस चौकीत ...यासाठी पोलीस चौकी परिसरात मंडप घालण्यात आला होता, संगीताची धून सुरु होती. बिर्याणीचा घमघमाट सुटला होता. त्यामुळे वाढदिवस दणक्यात साजरा झाला, असे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने १६ जुलै रोजी दिले होते.
राजकीय नेत्याला लाजवेल असा तेरच्या पोलिसाचा वाढदिवस साजरा ...
त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांनी कोविड- १९ नियमांचे उल्लंघन करून शासकीय परिसरात वाढदिवस साजरा केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे केली आहे. त्याचे वृत्तही उस्मानाबाद लाइव्हने २७ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते.
पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
उस्मानाबाद लाइव्हच्या पाठपुराव्यानंतर पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी तेर पोलीस चौकीचा पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी भूमच्या उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.
पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांच्याविरुद्ध भादंवि १८६० चे कलम १८८, २६९,२७०,२७१ सह कलम २,३,४ ( साथ रोग प्रतिबंधक ) अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सुभेदार यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.