‘तबलीगी जमात’सारख्या संघटनांवर कठोर कारवाई करा -हिंदु जनजागृती समिती.

 
‘तबलीगी जमात’सारख्या संघटनांवर कठोर कारवाई करा -हिंदु जनजागृती समिती.

कोरोना विषाणुमुळे जागतिक पातळीवर  47   हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू ,   तर  9   लाख  40   हजारांहून अधिक लोख संक्रमित झाले आहेत .   भारतात ही महामारी पसरू नये ,   म्हणून शासनाने ‘जनता कर्फ्यू’ ,   जमावबंदी , ‘ लॉकडाऊन’ ,   संचारबंदी आदींसारख्या विविध उपाययोजना करत देशभरातील सर्व धार्मिक स्थळेही बंद केली आहेत .   असे असतांना आजही देशभरातील अनेक मशिदी ,   सभागृह ,   इमारतीचे टेरेस या ठिकाणी सरकारी आदेश पायदळी तुडवत मोठ्या संख्येने एकत्र जमून नमाज पढला जात असल्याच्या घटना सोशल मिडियातून उघड होत आहेत . ‘ टिकटॉक’सारख्या संकेतस्थळांवर मुसलमानांनी मास्क न लावण्याचे ,   सोशल डिस्टंसिंगचे पालन करू नये ,   असे व्हिडियो पसरवण्यात आले .   आतातर देहलीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशभरातील अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे .   तसेच या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी अनेक जण हे ‘पर्यटक विजा’ घेऊन भारतात आल्याचे आणि बेकायदेशीरपणे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे उघड झाले आहे .   कोरोनाचा संसर्ग पसरू नये ,   यासाठी शासनाच्या आदेशांचे पालन करत हिंदूंनी मंदिरे बंद ठेवत समाजभान राखले ;   मात्र मुसलमान समाजातील काही समाजविघातक प्रवृत्ती या आदेशांना धुडकावत ‘कोरोना’ला रोखण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालत आहेत आणि समाजाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहेत .   अशा प्रवृत्तींवर तसेच तेथील मौलवी आणि तबलीगी जमात यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी ,   अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री .   रमेश शिंदे यांनी केली आहे .
    एकीकडे ‘सोशल डिस्टसिंग’ होत नसल्याने आणि जमावबंदीच्या आदेशांचे पालन न करणार्‍या लोकांना पोलीस लाठ्यांचा मार देत आहेतजे कायद्याचे पालन करत नाहीतत्यांच्यावर कारवाई करायलाच हवीमात्र मुसलमानांकडून याचे पालन होत नसल्याबद्दल त्यांच्यावर कुठेही कठोर कारवाई झाल्याचे दिसत नाहीहे दुर्दैव आहेअनेक मशिदींमध्ये विदेशी मुसलमान येऊन बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेतत्यांना धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेण्याची अनुमती नसतांना त्यात ते सहभाग घेत आहेतया गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेतआतातर कोरोनाग्रस्त असलेले मुसलमान रुग्ण आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर थुंकत असल्याचीतसेच त्यांची तपासणी करण्यास गेलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर आणि पोलिसांवर हल्ले करत असल्याची वृत्ते येत आहेतही मानसिकता अत्यंत घातक असून समाजामध्ये कोरोना हेतूतः पसरवण्याची कृती हा गंभीर गुन्हाच आहेअशा समाजकंटकांना तात्काळ अटक करायला हवीएरव्ही पुरोगामित्वाच्या नावावर टेंभा मिरवणारेतसेच मुसलमान समाजातील नेते मंडळी यावर अद्याप मूग गिळून गप्प आहेत, असेही    रमेश शिंदे यांनी म्हटले आहे. 

From around the web