राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्गावर 17 मे 2023 पासून हेल्मेट सक्ती

 
s

धाराशिव :- गेल्या काही महिन्यापासून जिल्हयात अपघाताचे प्रमाण वाढत असून यात दुचाकीस्वार यांच्या डोक्याला मार लागुन मृत्युचे गंभीर जखमी होणेचे प्रमाणात वाढ झालेली आहे.हेल्मेटच्या वापराने अनेक दुचाकीस्वारांचे प्राण वाचतात,परंतू बरेचसे दुचाकीस्वार नागरीक हेल्मेटचा वापर करीत नाहीत.तरी दुचाकीस्वार नागरिक यांनी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करून सदर हेल्मेटविरोधी कारवाई अभियानामध्ये सहकार्य करावे. 

सदर अपघातांना प्रतिबंध करण्याकरिता अपर पोलीस महासंचालक (वा),महाराष्ट्र राज्य मुंबई डॉ.रविंद्र सिंघल, पोलीस अधीक्षक,महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद परिक्षेत्र,डॉ अनिता जमादार,पोलीस उप अधीक्षक,महामार्ग सुरक्षा पथक,औरंगाबाद परिक्षेत्र डॉ.दिलीप टिप्परसे यांचे मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र,नळदुर्ग यांचे मार्फतीने माहे मे-2023 या महिन्यापासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करण्याचे विशेष अभियान प्रारंभ करण्यात आलेले आहे. 

तरी दुचाकीस्वार नागरिक यांनी प्रवासा दरम्यान हेल्मेटचा वापर करावा व सदर हेल्मेट विरोधी कारवाई अभियानामध्ये विनाहेल्मेट कारवाई होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक,उमाजी राठोड यांनी केले आहे.

From around the web