कोविडची येणारी लाट थोपविण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे

कोरोना लस सुरक्षित असल्याने गरोदर मातांनी घ्यावी : राहूल गुप्ता

 
s

उस्मानाबाद - कोविड-19 ची आपत्ती अद्याप संपलेली नाही.किंबहुना सध्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची कोविड बाबत नुकतीच आढावा बैठक बोलवण्यात आली होती.त्यावेळी त्यांना सूचना देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी येणाऱ्या काळात कोविडची लाट थोपविणे आवश्यक आहे.त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे,अशा सूचना दिल्या.

      नागरी व ग्रामीण भागात तपासण्या वाढविणे,लसीकरणावर भर देणे,कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे,समाजातील दुर्बल व अति जोखीमीचे घटक जसे ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारी नागरिक,गरोदर माता,अनाथ बालके व स्थलांतरीत समूह यांच्यावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.यावेळी तालुकानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला.

 या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे एस.एन.,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद जे.एन. व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते

कोरोना लस सुरक्षित असल्याने गरोदर मातांनी घ्यावी : राहूल गुप्ता

 कोरोना संसर्ग हा दुर्धर आजारी व्यक्ती,वयोवृध्द व्यक्ती व गरोदर मातांना जास्त होऊ शंकतो.या पार्श्वभूमीवर गरोदर मातांना कोरोना लसीकरण करून घेणेबाबत शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयात   आज ( 22 जुलै )मातृत्व संवर्धन दिन अभियानाच्या निमित्त फक्त गरोदर मातांच्या कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. गरोदर मातांसाठी कोरोना लस अत्यंत सुरक्षित असल्याने त्यांनी ही लस घेऊन स्वत:ला संरक्षित  करावे , असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे.

       जिल्हयात आज एकूण 58 ठिकाणी केवळ गरोदर मातांसाठी आयोजित केलेल्या लसीकरणात  521 मातांचे लसीकरण करण्यात आले .तथापि , दि 9 जुलै 2021 रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान दिनी 700 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे .या लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, आशा सेविका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,समुपदेशक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

      कोविड लसीमुळे कोविड गंभीर स्वरुपाचा होत नाही,कमी दिवसाची प्रसुर्ती,नवजात बालकांचा मुत्यू होणे,प्रसुतीच्या वेळी गुंतागुंत होणे या बाबी सहजपणे टळू शंकतात म्हणून लस घेणे आवश्यक असल्याचेही श्री.गुप्ता यांनी म्हटले आहे.

From around the web