गुटख्याची गाडी पकडली पण दाखवला जबरी चोरीचा गुन्हा 

नळदुर्गच्या तत्कालीन सपोनि सिद्धेश्वर गोरेचा प्रताप 
 
x

नळदुर्ग -  नळदुर्गचे सपोनि सिद्धेश्वर गोरे यांचे अनेक काळे धंदे धाराशिव लाइव्हने उघडकीस आणल्यानंतर त्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी कऱण्यात आली आहे. त्यांच्या आणखी एका प्रतापाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून, याची  तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षकापर्यंत गेली आहे. 

 उमरगा - सोलापूर किंवा नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर गुटखाची गाडी पकडून  चालकास पोलिसांची भीती दाखवून लाखो रुपयाची खंडणी  वसूल करणारी टोळी नळदुर्गमध्ये सक्रिय आहे. या टोळीवर यापूर्वी गुन्हे दाखल होऊनही ही  टोळी आजही तेच काम करत आहे आणि नळदुर्गचे  तत्कालीन सपोनि सिद्धेश्वर गोरे त्यांचा सहारा घेत होते. आपण पोलीस असल्याची किंवा पोलीस मित्र असल्याची बतावणी करून हा कुटीरउद्योग सुरु होता. 

नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावर दि. १९ जुलै रोजी रात्री  नळदुर्गच्या या टोळीने एक आयशर  टेम्पो ( क्रमांक एम एच २५, इजे  १४८६ ) अडवला आणि चालकास जबरी मारहाण करून, टेम्पो घेऊन नळदुर्गचे सपोनि सपोनि सिद्धेश्वर गोरे हवाली केले. गोरे यांनी चालकांबरोबर अर्थपूर्ण बोलणी करून दोन दिवसानंतर  चालक माडजे  यास बोलावून, काही अज्ञात लोकांनी मारहाण करून खिशातील ३० हजार लुटून नेल्याचा  जबरी चोरीचा ( भादंवि ३९४ ) गुन्हा दाखल केला आणि याप्रकरणी नळदुर्गमधील  दोघांना अटक केली. 

टेम्पोमध्ये गुटखा असताना, गोरे यांनी चालकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी आणि आपणास मिळालेला वाटा  ( पैसे ) देण्याऐवजी आपणावरच गुन्हा दाखल केला म्हणून नळदुर्गमधील सराईत गुन्हेगार चिडले. एका आरोपीच्या चुलत्याने कॉल रेकॉर्ड आणि पुरावे थेट पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना  दिले आणि अवघ्या चार दिवसात गोरेंची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली. 

त्या टेम्पोमध्ये लाखो रुपयांचा गुटखा असताना, सिद्धेश्वर गोरे यांनी टेम्पो सोडून का दिला ? गुटख्याचा गुन्हा दाखल का केला नाही ? याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गोरे यांच्यावर कडक कारवाई  करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात गोरे मालामाल झाल्याची चर्चा सुरु आहे. गोरे यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. 

सपोनि गोरेनी सोडलेल्या 'त्या' टेम्पोमध्ये गुटखाच होता, हे घ्या आणखी एक पुरावा ....

गुटखा तस्करीत नळदुर्ग पोलिसांचे हात गुंतले , हा घ्या पुरावा .... ( Video )

गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या पाच शहरात दहा टोळ्या झिरो पोलीस म्हणून महामागार्वर रात्रभर पहारा

From around the web