कोरोनाचा कहर :  उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मार्च रोजी १६४ रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडे सहाशे पेक्षा जास्त 
 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मार्च रोजी १६४ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि.१८ मार्च रोजी नव्या १६४  कोरोना रुग्णाची भर पडली तर १८  रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६३ झाली आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडे सहाशे पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

गेल्या दोन महिन्यात एकाच दिवशी १६४ रुग्ण आढळून आल्याचा हा पहिलाच दिवस असून, उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांत पुन्हा घबराट पसरली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८  हजार २२३  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ९७१  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web