कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २० मार्च रोजी १२५ रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या आठशेपेक्षा जास्त 
 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २० मार्च रोजी १२५ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि.२० मार्च रोजी नव्या १२५  कोरोना रुग्णाची भर पडली तर ३३  रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८१५ झाली आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या आठशे  पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ४६७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ६३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web