कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी ९०० पॉजिटीव्ह, १९ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७०८५
Fri, 30 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ३० एप्रिल ( शुक्रवार ) रोजी तब्बल ९०० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १९ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ३४८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३० जार ३४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९२२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७०८५ झाली आहे.