कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ मे रोजी ८१३ पॉजिटीव्ह, २४ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२५२
Thu, 6 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ६ मे (गुरुवार) रोजी तब्बल ८१३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २४ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ६९७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३४ हजार ४४९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १००५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२५२ झाली आहे.