कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी ५६४ पॉजिटीव्ह, एक मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ३६०३
Updated: Apr 9, 2021, 22:47 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज ९ एप्रिल ( शुक्रवार ) रोजी तब्बल ५६४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २६० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३६०३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ६६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १९ हजार ८४४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६२१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट