धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण येलगट्टे यांची जिल्हा कारागृहात पुन्हा रवानगी 

 
s

धाराशिव - धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली असता  न्यायालयाने  दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. पोलीस कस्टडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता, न्यायालयातीन कोठडी सुनावण्यात आली असून, येलगट्टे यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. 

 धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. सहाव्या गुन्ह्यात धाराशिव न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर येलगट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने जामीन  मंजूर करताच, पोलिसांनी २७ कोटीच्या घोटाळा  प्रकरणी अटक केली . त्यानंतर न्यायालयात उभे करण्यात आले असता  दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. पोलीस कस्टडी संपताच जिल्हा कारागृहात पुन्हा रवानगी  करण्यात आली आहे. 

मुख्याधिकारी  हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह पालिकेतील काही अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद असले तरी मुख्य सूत्रधार आजवर नामानिराळे होते. येलगट्टे बळींचा बकरा झाले होते, आजवर दबावामुळे त्यांनी तोंड  उघडले नव्हते, परंतु नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांनी अखेर पोलिसांसमोर तोंड उघडून मुख्य सूत्रधाराची नावे सांगितल्याचे कळते. येलगट्टे यांनी एका बड्या राजकीय पुढाऱ्याचा भाऊ, पालिकेचे आजवरचे कारभारी आणि पालिकेचे काही अधिकारी यांची नावे सांगितली पण पोलिसांनी ती रेकॉर्ड केली का ? हे अद्याप समजू शकले नाही.  येलगट्टे यांनी तोंड उघडल्याचे कळताच, एका बड्या राजकीय पुढाऱ्याने पोलिसांवर दबाव आणल्याचे कळते. 

काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

बोर्डे , पवार  फरार , पोलीस सहलीवर 

धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून २०  दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे यांना अद्याप अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना देखील  पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.  

पोलिसांनी आजवर दोघांना अटक करण्यासाठी पुणे, कोलापूर, मुंबई दौरे केले. पण त्यांचा दौरा पिकनिक टुर ठरला आहे. अटकेसाठी पोलिसांनी खरेच प्रयत्न केले का ? की नाटक केले ?  असा प्रश्न जनतेला पडला आहे. 

पोलीस लेखापाल सुरज संपत बोर्डे आणि लेखापरिक्षक प्रशांत विक्रम पवार यांना फरार घोषित करून, त्यांच्या संपत्तीवर टाच का आणत  नाहीत ? असा प्रश्न पडला आहे. 

From around the web