निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांचे पदावतन 

धाराशिव लाइव्हचा दणका 
 
sd

धाराशिव - धाराशिव नगर पालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांना  राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने पदावनत करत पुन्हा एकदा मुख्याधिकारी गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी गट-ब या संवर्गात पदावनत केले आहे. धाराशिव लाइव्हने सर्वप्रथम येलगट्टे यांचा भ्रष्टाचार  चव्हाट्यावर आणला होता. 

धाराशिव नगरपालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. पैकी चार गुन्हे दखलपात्र आहेत. १० दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस जेल भोगल्यानंतर  सध्या ते जामिनावर बाहेर आहेत,. 

नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर पालिकेत केलेल्या कथित भ्रष्टाचार  प्रकरणी ते चार दिवस पोलीस कस्टडीत होते. यावेळी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने त्यांना निलंबित करण्याऐवजी उलट पदोन्नती देऊन धाराशिवला बदली केली होती. 

धाराशिवमध्ये कार्यरत असताना, त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.अनियमित बांधकाम परवाना देणे, बेकायदा  गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर करणे,भंगार  विकणे, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे, कंत्राटदारांना कामाचे बोगस  चेक देणे, विविध बँकेत अनेक खाते उघडणे  आदी प्रकरणात ते अडकले. त्यांच्या काळातील अनेक फाईल्स सध्या गायब आहेत. हरीकल्याण येलगट्टे  यांच्याबरोबर पालिकेचे पाच कर्मचारी अडकले असून, तेही निलंबित आहेत. 

आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत  याप्रकरणी एकूण पाच तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्यावर हक्कभंग देखील दाखल केलेला आहे. त्यामुळे हरीकल्याण येलगट्टे  सध्या कोमात गेले आहेत.

s

s

From around the web