उस्मानाबादेत मस्त्यव्यवसाय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर अर्धनग्न आंदोलन

सीना कोळेगाव धरणात स्थानिकांना मच्छीमारीसाठी परवानगी  देण्याची मागणी

 
as

उस्मानाबाद - सीना कोळेगाव धरणात परप्रांतीय मच्छीमारांना दिलेली परवानगी रद्द करुन परांडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी मच्छीमारांना घेवुन जनशक्ती संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाने अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रौद्ररुप धारण केले असुन आंदोलकांनी अर्धनग्न होवुन मस्त्यव्यवसाय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान अनेक निवेदने देवुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी घेतला आहे.


सीना कोळेगाव धरणामध्ये परप्रांतीय मच्छीमारांना व्यवसाय करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी जाणीवपूर्वक परवानगी दिल्याची तक्रार असुन याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करुन सदर परवानगी रद्द करुन करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या पत्रांना आणि निवेदनांना जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवण्यात येत होती. 

s

दरम्यान जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी निवेदन देवुनही दखल न घेतल्याने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता शेकडो आंदोलक सहाय्यक आयुक्त मस्त्यव्यवसाय कार्यालयात आल्यावर त्याठिकाणी सहा. आयुक्त जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी सहा.आयुक्त यांच्या खुर्चीला मत्स्यहार घातला.  इकडे आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीसांचा मोठा फौजफाटा हजर झाला. पोलीसांनी तडजोडीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र सहा.आयुक्त टोलवाटोलवी करत असल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी अर्धनग्न होत कार्यालय ताब्यात घेतले आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. तरीही सहा.आयुक्त कार्यालयात येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आंदोलकांनी कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलुप तोडुन गच्चीवर प्रवेश केला टाकिवर जावुन घोषणाबाजी सुरु झाली. 

s


इकडे आंदोलकांचे आक्रमक व रौद्ररुप पाहुन पोलीसांनी दंगा काबु पथक, अग्निशामक दल अशा विविध यंत्रणा बोलाविल्या असुन जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अन्यथा कार्यालयाच्या वरुन उड्या मारुन आत्मदहन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. 

अधिकारीच ठेकेदार आहे

- स्थानिक मच्छीमारांना परवानगी मिळु नये यासाठी सहा.आयुक्त हेच त्या धरणामध्ये भागिदार आहेत. ते जाणूनबुजून स्थानिक मच्छीमारांवर अन्याय करत आहेत. त्यामुळेच कार्यालयात येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यत आम्ही माघार घेणार नाही.

- अतुल खुपसे पाटील
प्रदेशाध्यक्ष, जनशक्ती संघटना
 

From around the web