पालकमंत्री शंकरराव गडाख  दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर

 
gdakh

उस्मानाबाद -  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे दि. 16 आणि 17 सप्टेंबर 2021 रोजी दोन दिवसांच्या  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथे आगमन आणि येथील द्वारयुक्त बंधाऱ्याची पाहणी आणि जलपूजन, सकाळी 10.20 वा. हंगरगा येथून बोरनदवाडीकडे प्रयाण, सकाळी 10.40 वा. बोरनदवाडी येथे आगमन आणि येथील द्वारयुक्त बंधाऱ्याची पाहणी आणि जलपूजन, सकाळी 11.00 वा. बोरनदवाडी येथून तुळजापूरकडे प्रयाण, सकाळी 11.20 वा. तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आगमन व कोविड केअर सेंटरला भेट आणि लिक्विड ऑक्सिजन प्लांटची पाहणी, सकाळी 11.40 वा. तुळजापूर येथून दिपकनगर तांडा कडे प्रयाण, सकाळी 11.50 वा. दिपकनगर येथे आगमन आणि पाझर तलावाची पाहणी,दुपारी 12.05 वा. दिपकनगर तांडा येथून उस्मानाबादकडे प्रयाण, 

दुपारी 12.15 वा. उस्मानाबाद येथील ख्वॉजा नगर,स्काऊट गाईड येथे आगमन आणि जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : उस्मानाबाद येथील ख्वाजा नगर, श्री.धारासूर मर्दिनी देवी कमान), दुपारी 12.35 वा. ख्वॉजा नगर येथून जाधववाडी रोड, बार्शी नाकाकडे प्रयाण, दुपारी 12.45 वा. जाधववाडी रोड येथे आगमन आणि जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जाधववाडी रोड, बार्शी नाका), दुपारी 1.00 वा. जाधववाडी रोड येथून माणिक चौक कडे प्रयाण, दुपारी 1.10 वा. माणिक चौक येथे आगमन आणि जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.30 वा. माणिक चौक येथून शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण, दुपारी 1.40 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव आणि मुक्काम.

दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रम व इतर कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाशी तालुक्यातील पारगाव कडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. पारगाव येथे आगमन आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, सकाळी 11.30 वा. पारगाव येथून अहमदनगरकडे प्रयाण.

From around the web