पालकमंत्री शंकरराव गडाख सोमवारी उस्मानाबादेत
सोमवार दि. १९ एप्रिल रोजी धावता दौरा
Sun, 18 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख गायब होते. २६ जानेवारीनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यावर उस्मानाबाद लाइव्हने टीकेची झोड उठवली होती.
अखेर पालकमंत्री शंकरराव गडाख सोमवार दि. १९ एप्रिल रोजी उस्मानाबादेत प्रकटणार आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे -
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे उद्या ( सोमवार ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत . दुपारी 1 : 30 मिनिटांनी ते जिल्हा रुग्णालयास आणि ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी करणार आहेत . येथेच पालकमंत्री श्री . गडाख उपस्थित डॉक्टर आणि पत्रकारांशी चर्चा करणार आहोत .त्यानंतर ते पुन्हा नगरला परतणार आहेत.