अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक समितीची भव्यदिव्य महाशिवरॅली

 
s

धाराशिव - हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने रविवारी (दि.19) धाराशिव शहरात भव्यदिव्य महाशिवरॅली काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर हे यंदाच्या रॅलीचे विशेष आकर्षण होते.


धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 11 वाजता महाशिवरॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये सहभागी शिवभक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर हे आवर्जुन उपस्थित होते. हातात भगवे झेंडे घेऊन शहरासह तालुक्याती शिवप्रेमी मावळ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. महाशिवरॅलीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ताजमहल टॉकीज, राजमाता जिजाऊ उद्यान, नेहरु चौक मार्गे ही रॅली काळा मारुती चौक, जिल्हा पोलीस निवासस्थान, तांबरी विभाग, राजमाता जिजाऊ माँसाहेब चौक, माणिक चौक, काकडे प्लॉट, महात्मा बसवेश्वर चौक येथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विसर्जित करण्यात आली.

d


महाशिवरॅलीच्या यशस्वीतेसाठी शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, उपाध्यक्ष रवि मुंडे, सचिव कंचेश्वर डोंगरे, कार्याध्यक्ष गौरव बागल, कोषाध्यक्ष मंगेश निंबाळकर यांच्यासह पदाधिाकारी बाळासाहेब पाटील, कृष्णा साळुंके, आकाश कोकाटे, ओंकार शितोळे, व्यंकट कोळी, शुभम लोकरे, मनोज मोरे, कुणाल जानराव, अमोर सिरसट, रवी पवार, अ‍ॅड.सागर साळुंके, नागेश कदम, आकाश भोसले, सुनील जाधव, हणमंत कदम, उल्हास उंबरे, पाशाभाई शेख यांच्यासह शेकडो मावळ्यांनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील आदर्श महाशिवरॅली - भूषणसिंह होळकर

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाशिवरॅलीमधील शिवप्रेमी मावळ्यांचा उत्साह पाहून शिवरायांच्या सोबतीने आपण मोहिमेवर जात आहोत की काय, असा भास झाल्याचे उद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी काढले. महाशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकार्‍यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन, मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही शिस्तबद्ध संचलन, महिला, मुलींचा उत्स्फुर्त सहभाग अशा विविध वैशिष्ट्यांमुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीची ही महाराष्ट्रातील महाशिवरॅली असल्याचे ते म्हणाले.
 

From around the web