कळंब तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले 

 सोशल मीडियावर उमेदवारांचा जोरदार प्रचार
 
कळंब तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले

कळंब - कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात  ग्रामपंचायत निवडणुकीमुळे  वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत पैकी ६ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून ५३ ग्रामपंचायतसाठी अटीतटीच्या लढती होत आहेत. 

कळंब तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या  ईटकूर, येरमाळा, आणि मंगरूळ ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीचा सामना  होत आहे. निवडणूक लागलेल्या गावात 'ऐका  हो ऐका'  म्हणत गल्लोगल्ली भोंगे फिरत आहेत, मात्र , उमेदवार गल्लीत आणि मतदार शेतात अशी परिस्थिती आहे.ग्रामीण भागातील लोक सकाळी सहा ते सात वाजताच गाव सोडून शेतात जात असल्याने उमेदवार हतबल आहेत. 

याच कारणामुळे  उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.  व्हाट्सएप आणि  फेसबुकच्या  माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारांना नेहमीची  आश्वासने दिली जात आहेत.त्याच्यापेक्षा मी किती चांगला आहे, हे पटवून दिले जात आहे. 


ग्रामीण भाग हा सोशल मिडियापासून दूर होता.ग्रामीण भागातील नागरिकांना सोशल मीडियाची जास्त ओळख नव्हती.बदलत्या युगानुसार आता ग्रामीण भागात सुद्धा सोशल मीडियाची ताकद कळली आहे. ग्रामीण भागात सुद्धा  लोकांच्या हातात आता स्मार्ट फोन आल्याने आणि गावोगावी इंटरनेट सुविधा पोहोचल्याने सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरु आहे.

From around the web