गुड न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण केवळ २८
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. रविवारी आलेल्या रिपोर्टनुसार केवळ २८ नवे रुग्ण आढळले आले आहेत बरे होऊन ४५ रुग्ण घरी परतले आहेत. गेल्या दोन दिवसात एकाही मृत्यू झालेला नाही.
आज जे नवीन २८ रुग्ण दाखल झाले आहेत, त्यात उस्मानाबाद - १३, तुळजापूर-१, कळंब - ८, वाशी - ३, भूम -२ असा समावेश आहे तर उमरगा, लोहारा आणि परंडा तालुक्यामध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. रविवारी बरे होवून ४५ जण घरी गेलेआहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३.९९ टक्क्यावर गेले आहे. तर मृत्युदर ३.६३ टक्के आहे. जिल्ह्यात आजवर १५ हजार ८७ रुग्ण आढळून आले आहेत. पैकी १४ हजार १८० बरे झाले आहेत. सध्या उपचाराखालील रुग्ण केवळ ३६० आहेत.आतापर्यंत ५४७ जण मृत्यू पावले आहेत. सविस्तर तपशील उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
उस्मानाबाद जिल्हा सुरुवातीला तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये होता.त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती. मागील महिन्यापासुन रुग्ण संख्या कमी झाली आहे. चालू नोव्हेंबर महिन्यात ६० च्या वरती संख्या गेली नाही.
कोरोना रुग्णाची संख्या घटल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. आता मंदिरे, शाळा केव्हा उघडणार ? याकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांनी रुग्ण संख्या कमी झाली म्हणून निष्काळजीपणा करू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टिंसिंग पाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.