ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी दिलासाजनक बातमी
मुंबई - ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी दिलासाजनक बातमी आहे. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारण्याचे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणूनच आज आणि उद्या या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणून आज २९/१२ व उद्या ३०/१२ या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश दिले आहेत(1/2) pic.twitter.com/gmlDVDCHta
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 29, 2020