गुड न्यूज : सोयाबीनचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार 

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी विमा प्रतिनिधींना फटकारले 
 
s

उस्मानाबाद  - महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री .दादाजी भुसे यांच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात  पीक नुकसानीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक  अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  जिल्ह्यातील ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांना खरीप पीकविम्याच्या २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढली. यामध्ये सोयाबीनसाठी ५३५५ ते ७८७५ हजार रुपये विमा अग्रीम रक्कम मिळणार आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिकचा पावसाने खंड पडल्यामुळे खरिपाची पीके (सोयाबीन,उडीद, मूग आदी पिके) वाळली आहेत. महसूल, कृषी विभाग व पीक विमा प्रतिनिधी मार्फत चाचणी प्रयोग केली केले असून ५० टक्के पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे विमा कंपनीने मान्य केले नव्हते. परंतु ही  समिती पाच सदस्यांची आहेव विमा प्रतिनिधीना कृषी विभागाची तांत्रिक माहिती नाही त्यांचे म्हणे नाकारले व महसूल व कृषी विभागाने केले पंचनामे व ५० टक्के पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे मान्य केले आहे.


पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार आहे. याबाबतची अधिसूचना काढण्याचा ठराव सर्वानुमते पास झाला आहे.


 जिल्ह्यातील ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांना खरीप पीकविम्याच्या २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढली. यामध्ये सोयाबीनसाठी ५३५५ ते ७८७५ हजार रुपये विमा अग्रीम रक्कम मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात ५१ ते ७० टक्क्यांपर्यंत सोयाबीनचे नुकसान झाले आहे. या प्रमाणातच अग्रिमची रक्कम ठरणार आहे. २०२० मधील खरीप पीकविम्याबाबत बैठकीत काहीच ठोस निर्णय झाला नाही.

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा २१ दिवसांचा खंड पडला आहे. यामुळे सोयाबीनसह सर्वच पिके अक्षरश: करपून गेली. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे निश्चित होते. या अनुषंगाने जिल्ह्यातून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार कृषी विभागाने पीकविमा कंपनीच्या सोबतीने जिल्ह्यात नमुना पंचनामे केले आहेत. यामधून नेमकी मंडळात किती नुकसान होऊ शकते याची टक्केवारी समोर आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बैठक घेतली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे हे वेगवेगळ्या वेळेत उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार, पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थिती होती. बैठकीत यासंदर्भात जोरदार चर्चा झाली. 

बैठकीमध्ये २०२० च्या खरीप विम्याबाबत काहीतरी निर्णय होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच लागून होती. मात्र, यावर काहीच निर्णय झाला नाही. ज्याच्या उपस्थितीत निर्णय होऊ शकतो असे कोणीही शासनाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके (सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके) करपली आहेत. महसूल, कृषी विभाग व पीकविमा प्रतिनिधींमार्फत चाचणी प्रयोग केली केले असून ५० टक्के पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे विमा कंपनीने मान्य केले नव्हते. परंतु, समितीने नुकसान मान्य केले. पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे करण्यात येणार आहे, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विमा प्रतिनिधींना फटकारले

जिल्हाधिकारी दिवेगावकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठकीत चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलेच फटकारले. सुरुवातीला प्रतिनिधी ३० टक्के नुकसानीवर अडून होते. तेव्हा दिवेगावकर यांनी “हातात कधी नांगर धरला नाही, तेव्हा तुम्ही कसे नुकसान ठरवणार’, असा प्रश्न विचारला. तसेच उंबरठा उत्पादन म्हणजे काय, पिकांची उत्पादकता कशी ठरवता, अशा प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना योग्य उत्तरे देता आली नाहीत.

विविध महसूल मंडलांमध्ये ५३ ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान

मंडळनिहाय सोयाबीनचे नुकसान (टक्के)

उस्मानाबाद शहर ५२, उस्मानाबद ग्रामीण ५३, ढोकी ५३, तेर ५७, पाडोळी ५४, बेंबळी ५३, केशेगाव ५२, जागजी ५५, तुळजापूर ५५, मंगरूळ ५५, इटकळ ५८, सावरगाव ५४, सलगरा (दि.) ५८, जळकोट ५९, नळदुर्ग ६०, उमरगा ५२, दाळींब ५३, नारंगवाडी ५१, मुळज ५३, मुरूम ५२, लोहारा ५१, माकणी ५२, जेवळी ५२, भूम ५२, माणकेश्वर ५३, अंबी ५५, वालवड ५५, ईट ५३, परंडा ५५, आसू ५२, जवळा ५६, अनाळा ५९, सोनारी ६५, वाशी ५४, तेरखेडा ५२, पारगाव ५१, कळंब ५४, इटकुर ७०, येरमाळा ६९, मोहा ६७, शिराढोण ६५, गोविंदपूर ६८. याच पद्धतीने वेगवेगळे मुग, उडीद, मका, बाजरी तुरीचे नुकसान दाखवले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अधिसूचना काढली...

s

s

s

s

From around the web