घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्या - जिल्हाधिकारी 

 
घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्या - जिल्हाधिकारी

उस्मानाबाद,-  जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे विशलेषण केल्यानंतर असे निर्देशनास आले आहे की, काही रुग्णांचा मृत्यू रुग्णांलयात दाखल झाल्यानंतर केवळ 72 तासात होत आहे.अशा प्रकारे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे अशा मृत्यूचे प्रमाण रोखणे आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देणे , यासाठी जिल्हयातील सर्व गावांमध्ये नगर पालिका, नगर परिषदा,नगर पंचायतीमध्ये माझे " कुटुंब माझी जबाबदारी " या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याचे आदेश संबंधित स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केवळ 72 तासामध्ये रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा अर्थ हे रुग्णं कोरोनाचे लक्षण दिसताच कोरोना चाचणी करत नाहीत तसेच काही दिवस आजार अंगावर काढुन उशिराने रुग्णांलयात दाखल होतात .  ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमे अंतर्गत ग्रामीण  आणि शहरी भागामध्ये स्थानिक प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या यत्रणांनी तातडीने आरोग्य सर्वेक्षणाच्या कामास सुरूवात करावी.

 प्रामुख्याने मधुमेही, उच्च रक्त दाब, कॅन्सर या सारख्या दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन ज्या व्यकतींची ऑक्सिजन पातळी 92 पेक्षा कमी आहे तसेच त्यांना ताप,सर्दी,कोरडा खोकला ,डोके दुखणे आदी कोरोनाची लक्षणे आहेत, अशा व्यकतींचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना चाचणी करावी. या चाचणीत जे व्यक्ती पॉझिटिव्ह येथील त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची कार्यवाही करावी , असेही या  आदेशात जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी म्हटले आहे.

From around the web