विठ्ठल मोरे कुटुंबाला न्याय द्या,नाभिक समाजाची मागणी

गावगुंडावर कार्यवाही करा अन्यथा राज्यभर आंदोलन करू 
 
विठ्ठल मोरे कुटुंबाला न्याय द्या,नाभिक समाजाची मागणी
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे नाभिक कुटुंबावर शेतीवादातून हल्ला

उस्मानाबाद -  तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील नाभिक समाजाचे विठ्ठल मोरे यांना शेतजमिनीच्या कारणावरून गाव गुंडांनी हल्ला करून जबर जखमी केले असून याविषयी जिल्हा नाभिक बांधवांच्या वतीने संबंधितांवर कठोर कारवाई करावी व नाभिक बांधवास योग्य तो न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील नाभिक समाज बांधव विठ्ठल मोरे, रत्‍नाबाई विठ्ठल मोरे, संकेत विठ्ठल मोरे या कुटुंबीयांवर  गावातील सपाते परिवारातील शिवाजी लिंबाजी सापते, मनोहर लिंबाजी सापते, विनोद शिवाजी सापते,चेतन उर्फ ओंकार मनोहर सापते, बारकुल शिवाजी सापते, शोभा मनोहर सापते इत्यादींनी मोरे कुटुंबीयांवर दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्राणघातक हल्ला केला


 या हल्ल्यामध्ये विठ्ठल मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे हाता पायात रॉड टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यांचा मुलगा लक्ष्मण विठ्ठल मोरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने गंभीर वार केल्याने  सोलापुरात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, सदर मोरे कुटुंबीय उपजीविकेसाठी चव्हाणवाडी येथे सलून व्यवसायाचे दुकानाच्या माध्यमातून काम करत आहे,मोरे कुटुंबांची गावात शेत जमीन आहे असून उपजीविका चालवत होते.

चव्हाणवाडी गावात नाभिक समाजाचे एक घर आहे, गावात मराठा समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे शेतजमिनीच्या कारणावरून सातत्याने शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे कृत्य गावगुंडांना अनेक वेळा मोरे कुटुंबियांसोबत केले आहेत,हा अन्याय नाभिक समाजातील एकटे घर असल्याने सातत्याने सहन करत होता.

 मौजे चव्हाणवाडी येथील तक्रार निवारण करण्यासाठी शत्रुघ्न हरिदास चव्हाण पोलीस पाटील यांना दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मोरे कुटुंबीय यांनी जमिनीच्या वादावरून विठ्ठल मोरे यांनी तक्रार दिली असता या तक्रारीचा राग मनात धरून तुम्ही आमची तक्रार का केली तर एकट्या नाव याचे घर गावात आहे तुझ्या नावावर ती जमीन आमचीच आहे त्या जमिनीत पाय ठेवला तर तुझे हात पाय कापून टाकेल तुझ्या सर्व कुटुंबियांना मारून टाकेल अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करून तलवार लोखंडी सळई इत्यादी हत्याराने साप्ते गाव गुंडांनी कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 या कृत्याचा महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा उस्मानाबाद च्या वतीने तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करून झालेल्या संपूर्ण प्रकारात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने घेऊन नाभिक समाज बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील मोरे कुटुंबियांस तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, मोरे कुटुंबीयांची सापते परिवार यांनी चव्हाणवाडी येथील कब्जा केलेली जमीन तात्काळ परत करण्यात यावी व मोरे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये 307 कलम लावून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आले सदर मागण्या मान्य न केल्यास आगामी दोन दिवसात सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देऊन 11 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या प्रकरणाचा आवाज उठवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या आदेशाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, धनंजय शिंगाडे, धनंजय राऊत, दाजी आप्पा पवार,व्यंकट पवार, दत्तात्रय भालेकर,किशोर राऊत,नितीन शेरखाने, जगन्नाथ पवार, बाळासाहेब गायकवाड, राम सुरवसे, अमोल चौधरी, देविदास पवार, अनिल माने, संदीप सुरवसे, संतोष महाबोले, चंद्रकांत माने, रामचंद्र दिघे, गोपाळ क्षीरसागर, नरसिंग माने, प्रवीण राजेंद्र, महादेव माने, शंकर गोरे,किरण इंगळे, सचिन चौधरी,राजेंद्र महाबोले, बालाजी काळे, बाबासाहेब गायकवाड उमेश सूर्यवंशी, दादा गोरे, ज्ञानेश्वर पंडित महादेव माळी,आबा खोत,रवी कोरे, शिवानंद कथले,सतीश कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

From around the web