प्रेम शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या .. 

... अन्यथा संपूर्ण गावात चूल बंद करून आमरण उपोषण 
 
w
वाखवाडी ग्रामस्थांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन 

धाराशिव  - वाणेवाडी येथील श्री संत नारायण  रामजी बाबा अध्यात्मीक संस्थेच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याची आत्महत्या नसून खून आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन वाखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनात म्हटले की,  वाणेवाडी येथील श्री संत नारायण  रामजी बाबा अध्यात्मीक संस्थेच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा दि. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष काका उंबरे , माऊली  महाराज उंबरे  आणि अन्य तीन जणांनी खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केलेला आहे. प्रेमच्या अंगावर ५० ते ६० जखमा असून, ही  आत्महत्या नसून खूनच आहे. पण  ढोकी पोलिसांनी गुन्हा नोंद करताना हलगर्जीपणा केला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण गावात चूल बंद करून आमरण उपोषण करण्यात येईल. 

या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. 

  1. प्रेम शिंदे याची आत्महत्या नसून खून असून, आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा 
  2.  प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्यूची  सीआयडी मार्फत चौकशी करावी 
  3.  आरोपी काका उंबरे  याची आश्रमशाळा अनधिकृत असल्याने ती तातडीने बंद करावी 
  4.  आरोपीना पाठीशी घालणाऱ्या ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत, उपनिरीक्षक गाडे , पोलीस कॉन्स्टेबल तरडे यांना  निलंबित करावे 
  5. पीएम रिपोर्ट अर्धवट देणाऱ्या तेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित  करावे 
  6.  दि. ४ ते ६ ऑगस्टचे ढोकी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य कार्यवाही करावी 

या निवेदनावर गावातील जवळपास पाचशेहून अधिक लोकांच्या सह्या आहेत. 

s

From around the web