कोविडपासून स्वतःचे व कुटूंबियांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण करून घ्या 

-  पालकमंत्री शंकरराव गडाख
 
gdakh
मिशन कवच कुंडल साठीच्या फिरत्या लसीकरण पथकांची स्थापना

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी फिरते लसीकरण पथक ही ग्रामीण आणि शहरी भागासाठी कार्यरत करण्यात आले आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण राहिले आहे, त्या सर्वांणी  लसीकरण करुन घेवून स्वत:चे आणि कुटुंबियांचे या आजारापासून संरक्षण करावे आणि जिल्हा कोविड मुक्त करण्यासाठी जिल्हा  प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आजतागायत जिल्ह्यामध्ये एकूण 9 लाख 63 हजार 500 (नऊ लाख त्रेसष्ट हजार पाचशे) डोसेस दिले गेलेले आहेत. यामध्ये पहिला डोस देण्यात आलेले 6 लाख 88 हजार 60 (सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार साठ) नागरिक आहेत. दुसरा डोस देण्यात आलेले 2 लाख 75  हजार 440 (दोन लाख पंचाहत्तर हजार चारशे चाळीस)  नागरिक आहेत. अद्याप 6 लाख 21 हजार  (सहा लाख एकवीस हजार) नागरिकांना पहिला डोस देणे आवश्यक  आहे. या शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष कोविड लसीकरण मोहिम मिशन कवच कुंडल दि. 08 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशीही माहिती श्री  गडाख यांनी  दिली आहे.                                   

या  मिशन कवच कुंडल साठी  जिल्ह्यामध्ये  लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोविड-19 ची लस घेतल्यामुळे कोविड-19 आजार होण्याचा धोका अत्यंत कमी होतो आणि आजाराची तीव्रता आणि मृत्यू टाळणे शक्य होते. याकरीता 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे असे सांगून श्री .गडाख यांनी  मिशन कवच कुंडल च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरण सत्रांची संख्या वाढविण्या सोबतच सत्रांची वेळ सायंकाळी उशीरापर्यंत ठेवण्यात येत येत आहे. जेणे करुन सध्या सोयाबीन काढणी आणि शेती मधील इतर कामे करुन उशीरा परतणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना लस घेणे सोईचे होणार आहे. शहरामध्ये मोबाईल टिम्सद्वारे जोखीमग्रस्त भाग, कार्यालय इत्यादी ठिकाणी जावून लसीकरण करत आहेत. आरोग्य विभागासोबत महसूल, पंचायत, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, पोलिस प्रशासन यांच्या सहभागाने सत्रांचे नियोजन आणि आयोजन करण्यात येत आहे, असेही पालकमंत्री श्री .गडाख यांनी स्पष्ट केले आहे.                  

 या कोविड लसीकरणाच्या अभियानात विविध संघटनांचे सहकार्य घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी ग्रामस्तरावर दवंडी देवून, शहरामध्ये घंटा गाड्यांवर ध्वनीफित लावून, स्थानिक वृत्तपत्रामधून, रेडीओवरुन, बॅनर्स आणि पोस्टर्स अशा विविध प्रकारे प्रसिध्दी देण्यात येत आहे. लसीकरण वाढविण्याकरीता प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. असेही श्री .गडाख यांनी सांगितले.

From around the web