हिवतापाच्या प्रसार रोखण्यासाठी वेळेत उपचार घ्या

 
हिवतापाच्या प्रसार रोखण्यासाठी वेळेत उपचार घ्या

उस्मानाबाद -  राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, हत्तीरोग डेग्यु, चिकुनगुनीया,जेई, चंडीपुरा,लेप्टोस्पायरासीस,काला आजार इत्यादी आजाराचा अंर्तभाव होतो.हिवतापाचा प्रसार करणाऱ्या अनाफिलीस डासाचा शोध सर रोनॉल्ड रॉस यांनी सन 1897 या वर्षी लावण्यात आला.

हिवताप या आजाराचा प्रसार हा अॅनाफिलीस डासाची मादी मार्फत होतो .हिवताप हा प्लासमोडीयम हया परोपजीवी जंतु पासुन होतो. हिवतापाचा अधिशयन काळ हा 10 ते 12 दिवसाचा आहे. हिवतापाच्या जंतुचे प्लासमोडीयम व्हायव्हॅक्स व प्लासमोडीयम फेल्सीफेरम हे दोन प्रकार आढळुन येतात.

हिवतापाचा प्रसार कसा होतो:- डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ता बरोबर हिवतापाचे जंतु डासांच्या पोटात जातात तेथे वाढ होवुन ते जंतु डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. मनुष्याच्या शरीरात हे जंतु लिव्हर मध्ये जातात तेथे त्यांची वाढ होवुन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येतो.

हिवतापाची लक्षणे थंडी वाजुन ताप येणे, ताप एक दिवसा आड किंवा सतत येवु शकतो,घाम येवुन अंग गार पडते,ताप आल्यानंतर डोके दुखते बऱ्याच वेळा उलटयाही होतात.हिवापाचे निदान हे आरोग्य कर्मचारी/आरोग्य सेवीका व अप्रत्यक्ष सर्वेलन्स मध्ये ताप रुग्णांचा रक्त नमुना घेवुन तपासणी करुन करता येते.अशा रक्त नमुन्यामध्ये हिवतापाचे जंतु आढळुन येतात. रोग निदान करण्याचे प्रामुख्याने पध्दती आहेत त्यामध्ये प्रयोग शाळेत सुक्ष्मदर्शकाद्वारे व तात्काळ          निदान पध्दती (Rapid Dignostic Test ) द्वारे करण्यात येते.

"निदान तत्पर, उपचार सत्वर हा हिवताप नियंत्रण कार्यक्रमाचा पाया आहे. वेळेवर रक्त नमुना घेणे वेळेवर तो नजीकच्या प्रयोग शाळेत तपासणे व वेळेवर समुळ उपचार देणे हिवताप नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख घटक आहेत.सर्व रुग्णांना वेळेवर समुळ उपचार दिल्यास हिवतापाचे प्रमाण मोठया प्रमाणात कमी होवू शकेल.

From around the web