अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या-एक लाख मिळवा
धाराशिव - जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन अवैधरीत्या गर्भलिंग निदान अथवा गर्भपात होत असल्यास जिल्हा रुग्णांलयातील पीसीपीएनडीटी सेल अथवा तालुकास्तरावर त्या कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून माहिती द्यावी.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे-पाटील
बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, यावेळी अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे,आयएमए अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख,वरिष्ठ स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी/सरोदे,स्त्रीरोगतज्ञ डॉ. शैलजा मिटकरी, जिल्हा माहिती अधिकारी, तेजस्विनि महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष नंदा पुनगुडे, लोक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता, पीसीपिएनडीटी लिगल ॲडव्हायझर Adv. रेणुका शेटे, जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित होते.
डॉ.गलांडे पुढे म्हणाले की अवैध लिंग चाचण्या व गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी. टोल फ्री क्रमांक 18002334475 या क्रमांकावर गोपनीय माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व दिलेली माहिती खरी असल्यास गुन्हा दाखल झाला असता माहिती देणाऱ्यास राज्यस्तरावरून खबरी योजना अंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.
आज दि.18 ऑगस्ट 2023 रोजी ,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात PCPNDT बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली .संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केस करणे,सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्राची त्रैमासिक तपासणी विविध बैठक आयोजन सोनोग्राफी केंद्राचे नूतनीकरण,अश्या इतर विषयावर चर्चा करण्यात आली. गर्भधारणा पूर्व व प्रस्तुतीपूर्व निदान तंत्र लिंगनिवडीस प्रतिबंध , कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सतत सतर्क असते दर दोन महिन्याला पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते उस्मानाबाद जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी विविध उपयोजना केल्या जातात,जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर बैठका घेऊन पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.