कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव  साजरा करावा - रौशन

 
s

उमरगा  - अद्यापही कोरोना संपला नसल्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी येथील शांतता समितीच्या दि .८ रोजी पार पडलेल्या बैठकीत व्यक्त केले.

                गणेशोत्सवा निमित्त शहरातील चिंचोळे मगंल कार्यालयात दि.८ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे होत्या. तर व्यासपिठावर उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, प्रभारी तहसिलदार एन.आर. मुलूरवार, पोनि मुकूंद आघाव, मुख्यधिकारी रामकृ्ष्ण जाधवर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधिर पवार, सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे होते.

          यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक  राजतिलक रौशन म्हणाले की, गेल्यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गणेशोत्सव झाला नाही. यंदा कोरोना ओसरला असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनुराधा उदमले, सिद्रामप्पा चिंचोळे, आतीक मुन्शी, बाबा औटी, सुधाकर पाटील, दिलीप भालेराव, कैलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माधव पवार, शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे, नगरसेवक बालाजी पाटील, सचिन जाधव, योगेश तपसाळे, चंद्रशेखर पवार, नितीन होळे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, संदीप चौगुले आदीसह विविध मडंळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक आघाव यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रविण स्वामी यांनी मानले. यावेळी कोरोना नियमाप्रमाणे शारीरीक अंतराचे, मास्क, सॅनिटायझरचे काटेकोर पालन करण्यात आले.

a


प्रास्ताविकात पो.नि आघाव म्हणाले की, या भागातील ६१ गावात बैठका घेऊन एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचे आवाहन केले असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा तालुका शांतताप्रिय असून जनतेचे सहकार्य असते. पोलिस व जनता मित्र असून या ठाण्यात अशी मैत्रीची परंपरा कायम असल्याचे
त्यांनी नमूद केले.

From around the web