गण गण गणात बोते ... श्री गजानन महाराज पालखी सोहळा सोमवारी धाराशिवमध्ये 

 
s

धाराशिव - श्रीक्षेत्र शेगांव येथून पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी निघालेला श्री गजानन महाराज पालखी सोहळा आज ( शनिवारी ) तेरणा कारखाना , ढोकी येथे मुक्कामी पोहचला आहे. 

उद्या सकाळी तेरणा कारखाना येथून प्रस्थान होऊन, उपळा  ( मा. ) येथे मुक्काम राहणार आहे. सोमवार दि. १९ जून रोजी हा पालखी सोहळा धाराशिव शहरात पोहचणार आहे. 

s

सकाळी ९ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पालखीचा विसावा राहणार आहे. त्यानंतर वारकऱ्यांना जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या वतीने स्नेहभोजन दिले जाणार आहे. त्यानंतर पालखीचे प्रस्थान शहरात होणार आहे. 

भानूनगर , पोलीस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट, बसस्थानक , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पालखी देशपांडे स्टॅन्ड, नेहरू चौक, काळ्या मारुती मार्गे लेडीज क्लबच्या मैदानावर मुक्कामास असेल. मंगळवारी सकाळी पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. 

From around the web