ढोकी पोलीस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक  गाडे यांचा उर्मटपणा 

पोलीस अधीक्षकाकडे  तक्रार दिली तर पोलीस अधीक्षकाना  एफआयआर  फाडायला सांगा 
 
s

धाराशिव - इर्ला  येथील एका शेतकऱ्याची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीस गेली होती, त्या शेतकऱ्याने ढोकी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली असता, पोलीस उपनिरीक्षक  गाडे यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक, धाराशिव आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश ( कळंब ) यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर रमेश यांच्या आदेशानुसार तो शेतकरी पुन्हा ढोकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेला असता, तुम्ही पोलीस अधीक्षकाकडे  तक्रार दिली तर पोलीस अधीक्षकाना  एफआयआर  फाडायला सांगा , अशी  उर्मटपणाची भाषा पोलीस उपनिरीक्षक  गाडे यांनी वापरली. त्यानंतर त्या शेतकऱ्याने पुन्हा रमेश यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी गाडे यांची चांगलीच हजेरी घेतली आणि दुसऱ्याला एफआयआर फाडायला सांगितला आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याची तक्रार नोंदवण्यात आली. 

चोरीची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार देणे, फिर्यादीस मानसिक त्रास देणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गाडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी इर्ला येथील शेतकरी चंद्रसेन ठवरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. 

ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत सध्या रजेवर असून, गाडे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे, मात्र गाडे यांनी उद्दामपणा सुरु केला असून, त्यांची तत्काळ उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

s

s

 

From around the web