उस्मानाबाद पोलीस दलातील चौघांना ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह' जाहीर 

 
उस्मानाबाद पोलीस दलातील चौघांना ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह' जाहीर

उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलातील चौघांना ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहीर झाले आहे. ”महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यादरम्यान उत्तम, उल्लेखनिय, प्रशंसनीय कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रती वर्षी ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहिर केले जाते.

 सन- 2020 या वर्षात महाराष्ट्र पोलीस दलातील 799 पोलीस अधिकारी- अंमलदारांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आज दि. 30.04.2021 रोजी जाहिर झाले.

            पोलीस विभागात सलग 15 वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल सन- 2020 चे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र उस्मानाबाद पोलीस दलातील 1)संजय सुबराव बाबर, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा 2)शांताराम बबन वाघमोडे, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय 3)इजहार अहमद शेख पोहेकॉ- 119, पो.ठा. येरमाळा 4)वाहेद गफुर मुल्ला पोहेकॉ- 305, पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांना जाहिर झाले आहे. 


सन्मानचिन्ह प्राप्त या चौघांचे मा. पोलीस अधीक्षकराज तिलक रौशन यांनी अभिनंदन केले असून पोलीस दलातील इतर सहकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेउन उत्कृष्ट कार्य करावे असे आवाहन केले आहे.

From around the web