तेरखेड्याजवळ भीषण अपघात , चार ठार, तीन जखमी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेड्याजवळ चाक म्हणून पंक्चर झाले म्हणून उभारलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला आयसर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार ठार आणि तीन जखमी झाले आहेत. तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या मालेगावच्या भाविकांवर शुक्रवारी पहाटे काळाने हा घाला घातला.
तिरुपतीला दर्शनासाठी जाणारे भाविक ज्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्यून प्रवास करत होते. तो टेम्पो ट्रॅव्हलर पंक्चर झाला होता. त्यामुळे तेरखेडा येथील माऊली हॉटेलजवळ टेम्पो उभा करण्यात आला होता. यावेळी काहीजण गाडीतच बसले होते. दरम्यान याच मार्गानं उस्मानाबादकडे जाणाऱ्या आयसरने या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो ट्रॅव्हरलाचा चुराडा झाला आहे.
तेरखेड्याजवळ भीषण अपघात, चार ठार, तीन जखमीhttps://t.co/V6z9XpZ6xd pic.twitter.com/ObNhREvqrl
— Osmanabad Live (@dhepesm) July 23, 2021
या अपघातात वाहनातील भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा. दरेगाव, ता. मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा. सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याविरुद्ध येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.