आळणीजवळ भीषण अपघात, चार ठार

 
a

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरापासून जवळ असलेल्या आळणी फाट्याजवळ कार आणि कंटेनर यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत.

 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही लातूरच्या दिशेने जात होती. अपघातात मृत्यू झालेले चौघेही लातूर जिल्ह्यातील निवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार थेट कंटेनरच्या खाली शिरली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

येडशी (जि.उस्मानाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासूनजवळील आळणी-ढोकी राज्यमार्गावर ट्रक व कारचा शुक्रवारी (ता.३१) सकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील  आळणी (ता.उस्मानाबाद) चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर लातूरकडे निघालेली कार (एमएच24 एए 8055) व ट्रॅक्टर घेऊन उस्मानाबादकडे निघालेला ट्रक (एमएच 04 एफबी 2055) यांची समोरासमोर जोराची धडक बसून झाली. या भीषण अपघातात कारमधील दोन महिला व दोन पुरूष यांचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक एस.एन.साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे व येडशी औट पोस्टमधील हेडकाॅन्टेबल अविनाश शिंदे, सी.व्ही. मुळखेडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. हा अपघात एवढा मोठा होता की ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रक समोरून कारवर गेला. सदर घटनेची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.


 

From around the web