उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

 
Osmanabad police

तुळजापूर  -  तुळजापूर शहरातील नविन बस स्थानकासमोरील ‘कृषीधन ईलेक्ट्रीक मोटार दुरुस्ती’ या दुकानाचा कडी- कोयंडा दि. 13- 14.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून दुकानातील दुरुस्तीस आलेल्या एकुण 34 विद्युत पंपांसह रिवायडींगचे 45 कि.ग्रॅ. तांबे धातूची तार असा माला चोरुन नेला. अशा मजकुराच्या दुकान मालक- मोहन सोपान भोसले, रा. गंधोरा, ता. तुळजापूर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिरढोण : शिराढोन, ता. कळंब येथील प्रविण सुनिल नानजकर यांच्या ‘कालीका शुज सेंटर’ या दुकानाचे शटर दि. 13- 14.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने वाकवून दुकानाच्या तिजोरीतील 74,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रविण नानजकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : दाळींब, ता. उमरगा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील खोलीतील बीएसएनएल भ्रमणध्वनी मनोरा यंत्रणेच्या अमारराजा कंपनीच्या 400 एएच क्षमतेच्या 24 बॅटरी दि. 07- 08.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या शाहुराज आप्पाराव गायकवाड, रा. केसरजवळगा यांनी दि. 14 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील संग्राम दिलीपराव शिंदे यांच्या गट क्र. 680 मधील शेतातील कुपनलीकेतील विद्युत पंप व केबल असा 25,000 ₹ माला दि. 13- 14.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या संग्राम शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web