हातलादेवी तलावातील तरंगते कारंजे, म्युझिक सिस्टीम चोरीला 


कागदोपत्री काम दाखवून लाखो रुपये लाटले 
 
 
s
 शिवसेना ( उबाठा ) आणि भाजप नेत्यांनी एकमेकांच्या भ्रष्टाचारावर घातले पांघरून 

धाराशिव -  शहराजवळील हातलादेवी तलावातील तरंगते  कारंजे , म्युझिक सिस्टीम  आणि मोटारी असा ९ लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाचे अभियंता श्रीकृष्ण शिंदे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मार्च महिन्यात चोरी झाली आणि फिर्याद सप्टेंबर महिन्यात देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी एक सुधारित खेडं अशीच या शहराची ओळख आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर आणि कामासाठी येथे येणाऱ्या लोकांवर  या शहराची आर्थिक उलाढाल सुरु आहे.  शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी फिरायला नेमकं कुठं जावं हा प्रश्न आहे. उन्हाळ्यात लोकांचा जीव गुरमरून जातो. 

नगर पालिकेने जिजामाता उद्यानावर लाखो रुपयाची उधळपट्टी करून  देखील हे  उद्यान  भकास आणि उजाड  पडले आहे .त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने लाखो रुपये उधळपट्टी केलेले हातळादेवी डोंगर आणि तलाव त्याच मार्गावर आहे. 

हालादेवी तलावात तरंगते  कारंजे , म्युझिक सिस्टीम  आणि मोटारी  बसवण्यात आल्याचे दाखवून लाखो रुपयाचे बिल उचलण्यात आले होते. किरकोळ काम दाखवून दिशाभूल कऱण्यात आली आणि बिल निघताच ते चोरीला गेल्याचे दखवण्यात आले. हातलादेवी डोंगर आणि हातलादेवी  तलाव सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली लाखो रुपये  लाटण्यात  आले आहेत. 

 शिवसेना ( उबाठा ) आणि भाजप नेत्यांनी एकमेकांच्या भ्रष्टाचारावर घातले पांघरून 

नगर पालिकेवर शिवसेना ( उबाठा ) गटाची सत्ता होती तर जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व होते.  शिवसेना ( उबाठा ) आणि भाजप नेत्यांनी एकमेकांच्या भ्रष्ट्राचारावर जणू घातले पांघरून घातले आहे.  तुम्ही आमच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्याच्या नाहीत , आम्ही तुमच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करणार नाही, अश्या वाटाघाटी करून आपसात तडजोड करण्यात आल्याने 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असे सुरु आहे. 

धाराशिव शहर आणि जिल्ह्याच्या विकासाचे मारेकरी नेमके कोण आहेत ? यावर आपली प्रतिक्रिया लिहा... 

From around the web