कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच हजार रुपये लाच 

तुळजापूर नगपालिकेचा कर्मचारी निलंबित 
 
कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच हजार रुपये लाच

तुळजापूर  - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात दररोज किमान २० जण मृत्यू पावत आहेत. अश्या भीषण संकटाच्या काळात मढ्याच्या  टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकार घडत आहेत. 


कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पाच हजार लाच घेण्याचा प्रकार तुळजापुरात घडला असून, याप्रकरणी पालिकेचा एका कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. 


 बामणी  गावातील  एक रुग्ण कोरोनाने मृत्यू पावला होता. या मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेचा कर्मचारी शंकर कांबळे याने पाच हजार रुपयांची लाच घेतली. त्याची  माहिती कळताच तुळजापूर मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी  खातरजमा केल्यानंतर  कांबळे यास  निलंबित केले आहे. दरम्यान, तुळजापूर येथे शुक्रवारी 13 मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२३ एप्रिल रोजी १६ जणांचा मृत्यू 

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. २३  एप्रिल ( शुक्रवार  ) रोजी तब्बल ७१९  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८८१  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३२  हजार ९६६  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २५  जार ९९५  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८१६  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१९५  झाली आहे.

From around the web