हरवलेले 11 मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांस परत

 
हरवलेले 11 मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांस परत

उस्मानाबाद -  मोबाईल फोन हरवल्या संदर्भात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध घेण्याचे काम सायबर पोलीस ठाण्या मार्फत निरंतर केले जाते. अशाच प्रकरणातील 11 मोबाईल फोन हे इतरत्र वापरात असल्याचे सायबर पोलीसांच्या निदर्शनास आले. या मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना पुरवण्यात आली.

 स्था.गु.शा. च्या पोनि  गजानन घाडगे यांच्या पथकाने वापरकर्त्यांशी संपर्क साधुन त्यांच्या ताब्यातून ते 11 मोबाईल फोन (एकुण किं.अं. 2,00,000 ₹) जप्त केले. हे मोबाईल फोन आज दि. 13.03.2021 रोजी मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी मोबाईल मालक- मधुकर निंबाळकर, दयानंद राठोड, पांडुरंग माने, कृष्णा जाधव, फिरोज पठाण, राजेंद्र मगर, महादेवी साठे, अनिल पुदाते, प्रकाश इंगळे, संजय पाटील, भाग्यश्री गवळी असे हजर होते. आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने त्यांनी उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त केले.

मोबाईल फोन शोध मोहिम स्था.गु.शा. चे पोउपनि सदानंद भुजबळ, श्रीमती- क्रांती ढाकणे, पोकॉ- बलदेव ठाकुर व सायबर पो.ठा. चे पोउपनि- श्री योगेश पवार, पोकॉ- सुनिल मोरे, अरविंद ढेकणे यांच्या पथकाने केली असुन त्यांच्या या कार्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. 

 चोरीचे दोन गुन्हे दाखल 

तुळजापूर: रामवरदायीनी प्राथमीक विद्यामंदीर, तुळजापूर या शाळेच्या कार्यालयाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 09- 10 मार्च रोजी दरम्यान तोडून आतील एचपी कंपनीच्या संगनकाचा सिपीयु व युपीएस असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या विद्यालय सचिव- मधुकर बाहुबली शेटे, रा. तुळजापूर यांनी 12 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी:
मांडवा, ता. वाशी येथील जानकाबाई लालासाहेब शिंदे यांच्या राहत्या घराची खिडकी नातेवाईक- बाळु अशोक शिंदे याने 12 मार्च रोजी 02.00 वा. सु. उघडून चोरी करण्याच्या उद्देशाने घरातील कपाट उघडत असतांना जानकाबाई शिंदे या जागी झाल्या असता बाळु शिंदे याने तेथून धुम ठोकली. अशा मजकुराच्या जानकाबाई शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web