उस्मानाबाद जिल्हयातील अंतिम मतदार यादी जाहीर 

43 हजार मतदारांची मतदार यादीत भर
 
s
 नगर पालिका, जिल्‍हा परिषद निवडणुकामध्‍ये मतदानाचा अधिकार मिळणार

 उस्मानाबाद -  दि.01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने दि.05 जानेवारी 2022 रोजी अंतीम मतदार यादी जिल्‍हास्‍तरावर, उप विभाग स्‍तरावर, तहसील स्‍तरावर , मतदान केंद्रस्‍तवराव तसेच पदनिर्देशि‍त ठिकाणी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमातंर्गत झालेल्या मतदार यादीत 43 हजार 292 नवीन मतदारांचा समावेश झाला आहे.

 या मतदारांना आता आगामी जिल्‍हा परिषदेसह , नगरपालीका  आणि महानगर पालीकांच्‍या निवडणुकांमध्‍ये मतदानाचा अधिकार प्राप्‍त झाला आहे. निवडणूक आयोगाच्‍यावतीने जिल्‍हयात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात  आला आहे. या कार्यक्रमानुसार 01 जानेवारी ,2022 या अर्हता दिनांकावर आधारित 18 वर्ष पूर्ण करणा-या नवीन मतदारांची नोंदणी करण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे जुन्‍या मतदार यादीत ज्‍यांची नावे दुबार, कायमस्‍वरुपी स्‍थलांरीत, मयत, आढळून न आलेले मतदारांची नावे  भारत निवडणूक आयोगाच्‍या निमयामानुसार कार्यपध्‍दती अनुसरुन वगळण्‍यात आली आहेत. तसेच मतदारांचा तपशिला बाबतच्‍या नोंदीही दुरुस्‍त करण्‍यात आलेल्‍या आहेत.

            जिल्‍हाधिकारी कौस्‍तुभ दिवेगावकर, यांच्‍या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे उप जिल्‍हाधिकारी डॉ.प्रताप काळे, नायब तहसीलदार चेतन पाटील यांनी जिल्‍हाभरात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले. बिएलओ च्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक मतदार केंद्रनिहाय नवीन मतदारांची नोंदणी करण्‍यात आली. या कार्यक्रमात नव्‍याने नोंदणी केलेल्‍या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट केली आहेत.

ऑनलाईन पध्‍दतीने मतदार नोंदणी वाढली

निवडणूक विभागाने ऑनलाईन पध्‍दतीने नोंदणी करण्‍याबाबत मतदारांमध्‍ये केलेल्‍या प्रचार व प्रसिध्‍दीचा परिणाम चांगला दिसून आला त्‍यानुसार जिल्‍ह्यामध्‍ये एकूण नोंदणी झालेल्‍या मतदारांपैकी 65 टक्के नोंदणी ऑनलाईन पध्‍दतीने झाली आहे. यामुळे मतदाराला आहे त्‍या ठिकाणावरुन नोदंणी करणे शक्‍य झाल्‍यामुळे त्‍याचा वेळ, श्रम, पैसा, हेलपाटे पासून वाचण्‍यास मदत झाली आहे.

 
संभाव्य निवडणुकांमुळे कार्यक्रमाला महत्व:

मुदत संपलेल्‍या जिल्‍हा परिषद, नगरपालिकांच्‍या निवडणूका आगामी काळात होणार आहेत. जिल्‍ह्यात काही महिन्‍यापूर्वी स्‍थानिक स्‍वराज्‍य स्ंस्‍थांच्‍या या निवडणूकांचे वेध लागले होते. इच्‍छुकांनी कामेही सुरु केली आहेत. याच काळात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु झाल्याने इच्‍छुक मंडळीनीही जास्तीत जास्त मतदारांचा यादीत समावेश होईल यासाठी प्रयत्न केले.

जिल्हयातील मतदारांची संख्या:

पुरुष मतदार 7 लाख 21 हजार 478, महिला मतदार  6 लाख 33 हजार 405, तृतीयपंथी मतदार-22 असे एकूण मतदार 13 लाख 5 हजार 490 आहेत.

 

विधानसभा मतदारसंघ

 

१५.०१. २०२१ रोजीचे मतदार

 

पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत

वाढलेले मतदार

 

वगळणी करण्‍यात आलेले मतदार

 

अंतीम मतदार यादी प्रसिध्‍दी दि.०५.०१.२०२२ रोजीचे एकूण मतदार

240-उमरगा

२९६८१७

८६१२

१८१६

३०३६१३

241-तुळजापूर

३५५५४६

१४००२

२३४१

३६७२०७

242-उस्‍मानाबाद

३५५२७३

११३२३

६१५८

३६०४३८

243-परंडा

३१८४०७

९३५५

४११५

३२३६४७

एकुण

१३२६०४३

४३२९२

१४४३०

१३५४९०५

आता पर्यंत जिल्‍ह्यात 2753 सैन्य मतदार ( सेना दलातील) मतदारांची नोंदणी झालेली आहे. जिल्‍ह्यातील मतदार यादी ही 100 टक्के  मतदारांच्‍या फोटोसहित आहे.  भारत निवडणूक आयोगाची  ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा  NVSP, Voter helpline APP, Garuda App ERO-NET वर आहे. 


 

From around the web