प्रेम शिंदेच्या मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा 

अन्यथा छावा संघटना धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार 
 
d
काका उंबरेचे गुलाबी लफडे पाहिल्याने प्रेमची हत्या ? 

धाराशिव -  प्रेम शिंदे याची आत्महत्या नसून हत्याच असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, तपासात  हलगर्जीपणा करणाऱ्या ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि राऊत यांना  निलंबित करावे आदी मागण्याचे निवेदन अखिल भारतीय छावा  संघटनेच्या वतीने  जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

वाणेवाडी  येथील काका उंबरे याच्या आध्यत्मिक आश्रमशाळेत राहणाऱ्या प्रेम शिंदे याचा दि. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रेमने काका महाराजांचे गुलाबी लफडे पाहिले होते. तो या गुलाबी लफड्याचे वाच्छता करेल म्हणून त्यास बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे  नंतर गळफास देऊन आत्महत्येचा  बनाव  करण्यात आला , असे प्रेम शिंदे याचे वडील लहू शिंदे म्हणणे आहे. ही माहिती त्यांना प्रत्यक्षदर्शीकडून मिळाल्याचे सांगितले. 

d

प्रेम शिंदे याची आत्महत्या नसून हत्याच असून याप्रकरणी आता अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, तपासात  हलगर्जीपणा करणाऱ्या ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक गाडे, पोलीस कॉन्स्टेबल तरडे यांना  निलंबित करावे , काका  उंबरे याची आश्रमशाळा अनधिकृत असल्याने ती बंद करावी अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे छावा संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांना  दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. या निवदेनावर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहित पाटील ( धाराशिव ) विठ्ठल यादव ( कळंब ), महादेव सूर्यवंशी ( लोहारा) , ज्योतीराव काळे, शिव्हरी भोसले, महेश साठे आदींच्या सह्या आहेत, 

प्रेम शिंदे याच्या  संशयास्पद मृत्यू  प्रकरणात ढोकी पोलीस निष्क्रिय ठरल्याने तपास ढोकी पोलिसाकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे.  

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांनी या प्रकरणाची गंभीर दखल  घेऊन, उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांना वाणेवाडी आणि वाखरवाडी येथे जाऊन लोकांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

पत्रकार कुकर्मीने प्रकरण दाबले 

स्वतःला स्टार पत्रकार समजला जाणारा 'उघडा डोळे बघा नीट'  चॅनलचा  कुकर्मी पत्रकार आर. के.  हा काका उंबरे याचा मावसभाऊ आहे. त्याचा  आश्रमशाळेत आणि शेतीमध्ये पैसा  गुंतलेला आहे. त्यामुळे त्याने प्रेम शिंदे याचे प्रकरण दाबण्यासाठी आपल्या पत्रकारितेचा दुरुपयोग केल्याचे कळते. इतकेच काय तर प्रेमची समाजात नाहक बदनामी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पत्रकार कुकर्मी ( आर. के ) यास सहआरोपी करावे, अशी मागणी पुढे येत आहे. 

 

g

 

From around the web