उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील संचिका गायब

आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 
 
zp obd
टर्म संपत आल्याने पदाधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरु 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्युतीकरणाच्या कामातील अनियमिततेच्या चौकशीची संचिका गायब झाली असून याप्रकरणी आनंदनगर  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सन २०१९ च्या विद्युतीकरणाच्या कामात अफरातफर झाल्याची तक्रार अन्नय्या स्वामी यांनी केली. त्या प्रकरणात संबंधित ८ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर कारवाई देखील निश्चित झाली होती मात्र ती मूळ संचिकांच जिल्हा परिषदेतून गायब झाली आहे. बांधकाम विभागाचे बळीराम मोरे यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पो.हे.कॉ चौधरी यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेत गेले काही महिने अनागोंदी सुरू असून पदाधिकाऱ्यांची टर्म संपत आल्याने खाबुगिरी जोरात सुरू आहे. प्रत्येक फाईल मध्ये आपल्याला काही तरी मिळाले पाहिजे सहखुशिने काहीतरी द्या असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या गडबडीचा नवा अंक समोर आला आहे. 

म्हणे ती फाईल लोकप्रतिनिधीच्या केबिन मध्ये गेली !

गहाळ झालेली फाईल जिल्हा परिषदेची सूत्रे हातात असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या केबिन मध्ये गेली होती अशी जिल्हा परिषदेत चर्चा आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने ती लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ठेवून घेतली मात्र वापस दिली नसल्याची देखील चर्चा आहे. त्या कर्मचाऱ्याने कोणाच्या सांगण्यावरून ती फाईल घेतली?  त्या लोकप्रतिनिधीने चौकशीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून फाईल गहाळ करण्यासाठी मलिदा घेतला होता का? या प्रश्नांची उत्तरे त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची चौकशी झाल्यानंतर समोर येणार आहे.

From around the web