हावरगांव,  शिराढोण,तुळजापूर, बसवंतवाडी येथे हाणामारी 

 
हावरगांव, शिराढोण,तुळजापूर, बसवंतवाडी येथे हाणामारी

कळंब: दिपक दत्तात्रय कोकाटे, रा. हावरगांव, ता. कळंब यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 13.05.2021 रोजी 23.00 वा. सु. भाऊ- अगरचंद दत्तात्रय कोकाटे यांच्या घरात घुसून घरातील फ्रिज व संसार उपयोगी साहित्याची लोखंडी कोयत्याने मोडतोड केली. तसेच कोयत्याने घरासमोरील दोन मोटारसायकलचे नमुकसान केले व अगरचंद यांसह त्यांची पत्नीस धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अगरचंद कोकाटे यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 452, 427, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 शिराढोण : मंगरुळ, ता. कळंब येथील तात्या व राहुल तात्या पवार या दोघा पिता- पुत्रांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 12.05.2021 रोजी 16.00 वा. सु. मंगरुळ शिवारातील जाधव वीट भट्टीवर गावकरी- शिवाजी मोतीराम पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी पवार यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: शेतातील हौद काढण्याच्या कारणावरुन हडको, तुळजापूर येथील जाधव कुटूंबातील बाळु, कुंदन, प्रकाश, अमर, विश्वास, प्रविण, अरविंद, मंगेश, सविता, बिरकु अशा दहा जणांनी संगणमताने दि. 11.05.2021 रोजी 18.30 वा. सु. अमृतवाडी शेत शिवारात गावकरी- रेणुका राजेंद्र जाधव यांसह त्यांचा मुलगा- अक्षय यांना शिवीगाळ ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, खोऱ्या, काठीने मारहाण करुन जखमी जखमी केले. अशा मजकुराच्या रेणुका जाधव यांनी दि. 14 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: बसवंतवाडी, ता. तुळजापूर येथील 1)भिमराव बनसोडे 2)बिरु बनसोडे 3)शामल बनसोडे 4)शितल बनसोडे या सर्वांनी दि. 11.05.2021 रोजी 09.00 वा. सु. बसवंतवाडी शिवारात शेत रस्त्याच्या कारणावरुन गावकरी- विष्णु वैजिनाथ बनसोडे यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले व मिरची पुड अंगावर टाकली. अशा मजकुराच्या विष्णु बनसोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web