तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना महिला कॉन्स्टेबल चतुर्भुज 

उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील लाचखोरी उघड 
 
तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना महिला कॉन्स्टेबल चतुर्भुज

उस्मानाबाद - भारतीय सैन्य दलात भरती  झालेल्या एका तरुणास कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या उस्मानाबाद  पोलीस मुख्यालयातील ज़िल्हा विशेष शाखेतील महिला पोलीस कॉन्स्टेबल रत्नामाला बजरंग क्षीरसागर हिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. 

मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार तरुण हा  आर्मी मध्ये भरती झाले असून त्यास आर्मी मध्ये जॉईन होण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र ( कॅरेक्टर सर्टिफिकेट )  आवश्यक होते. तक्रारदार याना चरित्र प्रमाणपत्र देण्यासाठी महिला पोलीस अंमलदार रत्नामाला बजरंग क्षीरसागर, नेमणूक ज़िल्हा विशेष शाखा उस्मानाबाद यांनी 300 रुपये लाचेची मागणी केली  परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे तक्रार केली. 


त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने सापळा रचून महिला पोलीस अंमलदार रत्नामाला बजरंग क्षीरसागर, नेमणूक ज़िल्हा विशेष शाखा उस्मानाबाद यांनी 300 रुपये लाचेची मागणी करून  पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याबाबत आनंद नगर, पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पो.ह. इफ्तेकर शेख, ,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य व चालक करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)यांनी केले आहे.
 

From around the web