खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे यांचा तुटवडा भासणार नाही 

 सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री गडाख यांचे निर्देश
 
खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे यांचा तुटवडा भासणार नाही
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक 

        उस्मानाबाद - कोविड महामारीचे संकट कमी झाल्यानंतर शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांना खऱ्या अर्थाने अनेक अडचणींना समोरे जावे लागणार.याची तीव्रता कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कर्ज,पिकविमा नोंदणी,पिकविम्याची एकूण ,दर्जेदार आणि गुणवत्तापुर्वक बियाणे व खत उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन मंत्री,मृद व जलसंधारण तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले ते जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीच्या प्रसंगी बोलत होते.

  यावेळी खासदार ओमप्रकाश निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या याद्या विमा कंपन्यांना पाठवून प्रत्येक शेतकऱ्याला पिकविमा मिळवुन देण्यासाठी विमा कंपन्यांना सूचना कराव्यात.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांकडून पंचनामे उपलब्ध करुन घ्यावेत आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करावा-शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल याची दक्षता घ्यावी तसेच पेरणीपूर्वी सर्व शेतकरी अर्जदारांना बँकांनी कर्ज वाटप करावे.कर्जाचा फॉर्म सर्व बँकांनी सोपा आणि समान ठेवावा जेणे करुन सर्व शेतकऱ्यांना फार्म भरताना अडचण होणार नाही.गत वर्षांची सरासरी पाहिले तर वर्षाला 650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येत होते.यावर्षी चांगला पाऊस झाला आहे आणि शासनाकडून 1200 कोटी रुपयांची मंजूरी मिळाली असून बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज वाटप करावे.एकही शेतकरी कर्ज मिळवण्यापासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी,असेही पालकमंत्री गडाख यांनी यावेळी निर्देश दिले.

   कृषी विभागा,जिल्हा प्रशासन आणि बँकांनी गतवर्षी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे.यावर्षीही ते  अधिक वेगाने काम करतील अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

उस्मानाबाद जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 7,48,500 हेक्टर असुन 6,74,193 हेक्टर क्षेत्र लागवडी लायक आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 760 मिमीअसुन सन 2020 मध्ये 859 मि.मि. (113 %) पावसाची नोंद झालेली आहे.खरीपाचे सरासरी क्षेत्र 5,32,739 हेक्टर आहे त्यामध्ये प्रमुख  सोयाबीन,तुर मुग व उडीद या पिकांचा समावेश होतो.जिल्हयामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे प्रमुख पिक आहे.खरीप हंगाम 2020 मध्ये एकुण 6,23,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती यामध्ये सर्वाधीक 3,74,600 हेक्टर ( 60 %)  सोयाबीन या पिकाची पेरणी झाली होती.जिल्हयाची सोयाबीन या पिकाची सरासरी उत्पादकता 860 किलो प्रति हेक्टर असुन खरीप हंगाम 2020 मध्ये ही उत्पादकता वाढुन 1677 किलो प्रति हेक्टर झालेली आहे.खरीप हंगाम 2021 करीता एकुण 6,04,000 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असुन यामध्ये 3,74,600 हेक्टरवर सोयाबीन हे पिक प्रस्तावित केलेले आहे.

खरीप हंगाम 2021 करीता  प्रस्तावित बियाणे बदल दरानुसार  जिल्हयाची  एकुण  गरज 94,724 क्विंटल आहे.सदर बियाण्याचा पुरवठा महाबीज व एन.एस.सी मार्फत 56,750 क्विंटल तर खाजगी बियाणे कंपन्या मार्फत 37,974 क्विंटल होणे अपेक्षित आहे. सद्या बाजारात बियाण्याचा पुरवठा नुकताच सुरु झालेला असुन 300 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. गुणवत्तापूर्ण, मुबलक प्रमाणात आणि वेळेवर  खते बियाणे पुरवठा करण्यासाठी तपासणी पथकामार्फत सनियंत्रण करण्यात  यावे. सोयाबीन पिकाकरीता मोठया प्रमाणात बियाण्याची गरज भासते परंतु कृषि विभागाच्या प्रचार प्रसिध्दी व आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत 2,98,000 क्विंटल सोयाबीन बियाणे चालु हंगामात पेरणीसाठी राखुन ठेवलेले आहे. 

बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करून सोयाबीन चे घरगुती बियाणे  वापरून पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्याचे आव्हान श्री गडाख यांनी केले . जमीन सुपीकता निर्देशांकाच्या आधारे खताचा संतुलित वापर करावा तसेच नत्रयुक्त खताचा अनावश्यक वापर टाळावा. जिल्हयाचा मागील तीन वर्षामधील खतांचा सरासरी वापर 57,275 मे.टन असुन खरीप 2021 करीता 63,190 मे.टन खताचे आवंटन मंजुर झालेल आहे. 1 एप्रिल 2021 पर्यंत शिल्लक व आज अखेर झालेली उपलब्धता असे एकुण 30,148 मे.टन  ( 48%) खत साठा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असुन हंगामामध्ये खताची टंचाई भासणार नाही.खरीप हंगामामध्ये गुणवत्तापुर्ण व दर्जात्मक कृषि निविष्ठांचा पुरवठा होणेकरीता जिल्हा व तालुकास्तरावर एकुण 26 गुणनियंत्रक कार्यरत आहेत.त्यांचेमार्फत जिल्हयातील कृषि निविष्ठा (खते,बियाणे,किटकनाशके ) विक्रेते यांचेकडील नमुने तपासणीकरीता घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर  एक व प्रति तालुका एक तपासणी पथक नेमण्यात आलेले असुन सदर तपासणी पथकामार्फत कृषि निविष्ठा सनियंत्रण करण्यात येणार आहे. बियाण्याचा व खताचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी .मागील वर्षी अप्रामाणित बियाणे नमुन्यांवर 96 कोर्टकेस  व 5 पोलिस केस दाखल करण्यात 

आलेल्या आहेत. सन 2020-21 मध्ये 2272 कोटी पिक कर्ज वाटपाचे उदीष्टाच्या तुलनेत 1218 कोटी (54%) पिक कर्जाचे वाटप झालेले आहे. चालु वर्षी 1800 कोटी रु.पिक कर्ज वाटपाचे उदीष्ट ठेवण्यात आलेले आहे. 

मागील तीन वर्षाचे पिक कर्ज लक्षांक व साध्य   (आकडेवारी रु.कोटी )
 

वर्ष            लक्षांक     साध्य    टक्केवारी
2018-19    1971         686        35
2019-20    2272.22    607.21    27
2020-21    2272.22    1218.44    54

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडत  असलेल्या  नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्पांतर्गत (पोक्रा योजना )जास्तीत जास्त शेतकरी  यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  पालक मंत्री  गडाख यांनी केले .नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पांतर्गत  287 गावातील 20488 शेतकऱ्यांना 58.95 कोटी अनुदानाचा  विविध घटकांतर्गत  लाभ देण्यात  आलेला आहे.येत्या खरीप हंगामामध्ये कृषि विभागामार्फत घरगुती सोयाबीन बियाणे बिजप्रक्रीया करुनच रुंद वरंबा व सरी पध्द्तीने पेरणे बाबत मोठया प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. चालु खरीप हंगामात सुध्दा गुणवत्तापुर्ण घरगुती बियाण्याच्या  बिजोत्पादनासाठी मोहिम हाती घेण्यात येणार असुन त्यामार्फत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यात येणार  आहे. तसेच रुंद सरी वरंबा पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी  व  निती आयोग मार्फत बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने  करण्याच्या सूचना पालकमंत्री गडाख यांनी दिल्या .

शेती शाळा शेतकरी प्रशिक्षण शेतकरी मेळावे  इत्यादी मार्फत शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषी यांत्रिकीकरण याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना  पालकमंत्र्यांनी दिल्या व ृषि विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन जिल्हयामध्ये 635 शेतीशाळांचे नियोजन करण्यात आलेले आहे यामध्ये महिला शेतीशाळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे.खतांची कार्यक्षमता वाढविणेसाठी व युरीयाचा अवाजवी वापर कमी करणेसाठी जमिन सुपिकता निर्देशांकाच्या आधारावर पिक निहाय खतांचा वापर करणेसाठी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावासाठी पिक निहाय,ग्रेड निहाय  खतांच्या मात्रा  काढण्यात आलेल्या आहेत.येत्या खरीप हंगामात तुर पिकात शेंडे खुडणे,मुग व उडीद पिकाचे भुरी व मावा पासुन पिकसंरक्षण करणे,कापुस पिकात बेसल डोसचा वापर करणे व लागवड अंतरामध्ये बदल करणे या सारख्या उत्पादन वाढीच्या  सुत्रांसाठी सुध्दा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विभागामार्फत शेतकरी बांधवांना गुणात्मक व दर्जात्मक कृषि निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणातुन नियोजन करण्यात आलेले आहे.
 

From around the web