कृषी विभागाच्या योजनांसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्र सादर करावेत

- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
 
d

उस्मानाबाद :-कृषी विभागाच्या प्रमख योजनांची अंमलबजावणी  2020-21 पासून MahaDBTपोर्टलद्वारे करण्यात येते.निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 30 दिवसांच्या आत त्यांची कागदपत्र या पोर्टलवर आपलोड करणे आवश्यक आहे.पण निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलै 2021 पूर्वी त्यांची कागदपत्र अपलोड करावीत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

या पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या केंद्र  व राज्य पुरस्कृत योजनांमधील विविध घटकांसाठी (कृषी यांत्रिकीकरण,सिंचन सुविधा,फलोत्पादन इ.)अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ऑनलाईन सोडत पध्दतीने जिल्हयातील शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे कमाल 30 दिवसांत आवश्क कागदपत्रे सादर करणे अपेक्षित होते.परंतु 90 दिवस उलटल्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांनी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलद्वारे सादर केलेली नाहीत.

 जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांमधील विविध घटकांसाठी ऑनलाईन सोडत पध्दतीने निवड झालेली आहे.परंतु त्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत.अशा सर्व शेतकऱ्यांनी दि.21 जुलै 2021 पुर्वी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलद्वारे सादर करावीत.अन्यथा आपण या घटकाचा लाभ घेण्यास इच्छुक नसल्याचे समजून आपली निवड ही कृषी विभागामार्फत रद्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी,कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
         

From around the web