उस्मानाबाद : पावसामुळे पिकनुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमाकंपनी/ कृषि विभागास माहिती देणे बंधनकारक

 
 उस्मानाबाद : पावसामुळे पिकनुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमाकंपनी/ कृषि विभागास माहिती देणे बंधनकारक


      उस्मानाबाद -जिल्ह्यामध्ये दिनांक 19 ऑक्टोबर-2020 ते 22 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत हवमान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे पिक विमा उतरविलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास काढणीपश्चात नुकसान भरपाई व स्थानिक आपत्ती या सदराखाली पिक विमा मिळू शकतो. पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येते.


यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास ऑनलाईन किंवा ऑफलाईन देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल, पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल १० दिवसात सादर करण्यात येईल.


        त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००२०९५९५९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित गावचे कृषि सहायक अथवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावी. विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही एका पध्दतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. याची नोंद घ्यावी असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

From around the web