पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 
ss

  उस्मानाबाद -राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकामार्फत शेतक-यांना पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. राज्यातील जे शेतकरी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दि.30 जून पर्यंत करतात,अशा शेतक-यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी शासनामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येत आहे.

  राज्यात एप्रिल,मे 2021 मध्ये उद्भभवलेल्या कोविड-19 परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतक-यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडी-अडचणी व साखर कारखान्यांकडून शेतक-यांना अद्याप देय असलेली FRP विचारात घेता राज्यातील जि.म.स.बँका व व्यापारी बँकांनी शेतक-यांना 2020-2021 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस महाराष्ट्र शासन,शासन निर्णय दि.01 जुलै 2021 अन्वये दि.31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  जिल्हयातील सर्व शेतक-यांनी आपलेकडील अल्पमुदत पीक कर्जाचे नुतणीकरण 31 जुलै 2021 पर्यंत करुन घेऊन डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

From around the web