ऑक्सीजनच्या पुरवठयाचे सहनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापन

 
ऑक्सीजनच्या पुरवठयाचे सहनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापन

उस्मानाबाद -  जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जिल्हयातील कोरोना रुग्णालय तसेच कोरोना हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा,याबाबत दिलेल्या  राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्हिडीओ कॉर्न्फसिंगमध्ये दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे  अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे आदेश आज येथे जारी केले आहेत.

या समितीत सदस्य म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन(मध्यम प्रकल्प-2) राजकुमार माने,तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, उपजिल्हा निवडणूक कार्यालयातील नायब तहसीलदार चेतन पाटील, अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधी )- दीपक सिंद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.हानबर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार , जिल्हा रुग्णांलयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सर्व ccc, DCH, DCHC याठिकाणी होण्या-या ऑक्सीजनच्या पुरवठ्याचेसनियंत्रण करण्यासाठी ही जिन्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात अली आहे .

दरम्यान ,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील सर्व कोचिड-19 रुग्णालये आणि कोवित्र-19 हेल्थ सेंटर मधील ऑक्सीजन पुरवा सुरळीत ठेवण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारही हे आदेश जारी करण्यात आले आहेत . या  समितीने जिल्हयातील दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणा-या Boting Plants,Bulk Suppliers यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल याची दक्षता घ्यावयाची आहे .

जिल्हा शल्य चिकित्सक,  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून जिल्हयातील सर्व ccc, DCH. DOHC याठिकाणी  देण्यात येणा-या ऑक्सीजनची मागणी, उपलब्धता, आवश्यकतेनुसार पुरवठा आदीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणे, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ccc. OCH. DCHC याठिकाणी  देण्यात येणा-या ऑक्सीजनच्या पुरवठादारांचे जिल्ह्यातील कारखान्यांना भेटी देणे आणि  त्यांच्याशी समन्वय ठेवून मागणी व आवश्यकतेनुसार ऑक्सीजन पुरवठा नियमित व सुरक्षित सुरू राहील याची दक्षता घेणे.जिल्हयातील सर्व ccc, OCH, DOHC याठिकाणी ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हयातील व इतर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादारांशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार मागणी नौदविणे व मागणीनुसार विहित वेळेत ऑक्सीजनचा पुरवठा होईल याअनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे.जिल्हा शल्य चिकित्सक यांनी  जिल्ह्यातील कोविड  रुग्णांवर औषधोपचार करणा-या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैदयकीय शिक्षण विभाग, नगरपालिकानगर पंचायती आणि खाजगी रुग्णालयांना प्रतीदिन लागणा-या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करावी आणि ती माहिती समितीच्या अध्यक्षांना सादर करावी.सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  यांनी लिक्वीड ऑक्सीजन उत्पादक, बॉटलिंग पॉन्ट्स आणि अन्न व औषध प्रशासनाचे ऑक्सीजन पुरवण्यासाठीचे जिल्हावार नोडल अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक तसेच लिक्वीड ऑक्सीजन आणि ऑक्सीजन सिलेंडरच्या किंमती यांची माहिती समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा शल्य चिकित्साक, यांच्याकडे सादर करावी.

सर्व रुग्णालयांनी तज्ञांनी दिलेल्या Protocol नुसारच ऑक्सीजनचा वापर करावा. ऑक्सीजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णास स्वत: ऑक्सीजन घेण्यास सांगू नये तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त कालावधीसाठी ऑक्सीजन लावू नये. कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत नियमितपणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा.

या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

From around the web