पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा 

श्रद्धा लांडगे , यश कोयले, राजश्री देवकर यांना पारितोषिक 
 
sd

उस्मानाबाद : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मल्हाराव होळकर यांच्यावरील चरित्रग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या  निबंध स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रा. मनोज डोलारे व प्रा. शिवाजी गाढवे यांच्या दोन सदस्यीय समितीमधून विजेत्याची घोषणा करण्यात आली होती. 

प्रथम :  श्रद्धा सोमनाथ लांडगे ,द्वितीय :  यश परेश कोयले, तृतीय  :  देवकर राजश्री बाळू  यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरमध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय सोनटक्के, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे, जिल्हा सचिव प्रा. मनोज डोलारे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुमित पालवे, लोहारा तालुका अध्यक्ष बाळू देवकर, सुरेश शिंदे व तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 

From around the web